सर्व काही असतांना, चुकल्या सारखे वाटते.
गाली हसू असतांना, मन रडू पाहते.
कोणी आयुष्यात नसतांना, चाहूल आल्याच्या लागते.
मन स्थिर असतांना, सैरभैर होऊ पाहते.
डोळे उघडे असतांना स्वप्न दिसू लागते,
खुळे मन त्या स्वप्नांना हाती धरू पाहते.
एकदा फक्त सांग देवा, का हेच प्रेम असते ?
- Ketan S Vadhavane