ketanv

 • प्रश्न
  ketanv | 23-Nov-2016
  Poems
  » Long
  प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,  वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे,  वाटते स्वछंद व्हावे त्या खुळ्या पक्ष्यां परी,  वाटते कि स्थिर व्हावे उंच त्या वृक्षा परी,  पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,  प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,  वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे. वाटते निश्चिन्त व्हावे सोडूनि चिंताच या, वाटते आता जगावे माझ्याच साठी मी पुन्हा, पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,  प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,  वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे. या जीवाला व्यर्थ वाटे बांध नात्यांचे आता  वाटते कि मुक्त व्हावे तोडुनी बंधास या  पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,  प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,  वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे. (आयुष्याच्या प्रवासात) पण उमगले सत्य मजला प्रश्न जीवन प्रेरणा, प्रश्न म्हणजे घाव सारे, आयुष्य म्हणजे शिल्प हे, घाव विना जे शिल्प घडते त्या शिल्प मी म्हणऊ कसे. - Ketan S Vadhavane 
  2 likes
  100 Views 3 Comments
 • तारांगण
  ketanv | 07-Dec-2016
  Poems
  » Long
  शोधण्याचा प्रयत्न करतो  अस्तित्व माझे तारांगणात, अंदाज लाऊ पाहतो सुखाचा मी एकांतात, निर्विकार या डोळ्यातून शोधू पाहतो स्वप्नाची वाट, कोणासठाऊक का  अपसुत येते निराशेची लाट, तरी धीर देऊन सोडत नाही स्वतःचीच मी साथ, आणि करू पाहतो त्या निराशेवरच मात, खंत एकाच सलत राहते मनात, करतांना निराशेवर मात नसते कोणाचीही साथ, नंतर करतांना विचार मनात वाटले देवाने  बांधली असेल आपलीही कोणाशी तरी गाठ. बांधली असेल आपलीही कोणाशी तरी गाठ. -ketan s. vadhavane
  1 likes
  105 Views 2 Comments
 • तोड़के बेड़ियाँ
  ketanv | 16-Dec-2016
  तोड़के बेड़ियाँ पैरोंसे यु चला मै ख्वाबोंके पीछे भगा डोडा फिर मै इन्तहा लेनेकी वक़्त ने भी है ठानी लेकिन तूफा से लड़नेकी हिम्मत मैंने पाली. तोड़के बेड़ियाँ पैरोंसे यु चला मै ख्वाबोंके पीछे भगा डोडा फिर मै आंसू पलकों तक आये फिरभी मैंने न दिखाए  ठुकराया दुनिया ने भी फिरभी ये घाव छुपाये  तोड़के कसमो को रस्मो को यु चला मै ख्वाबोंके पीछे भगा डोडा फिर मै इन्तहा लेनेकी वक़्त ने भी है ठानी लेकिन तूफा से लड़नेकी हिम्मत मैंने पाली. तोड़के बेड़ियाँ पैरोंसे यु चला मै. -Ketan S Vadhavane    
  1 likes
  112 Views 0 Comments
 • हेच प्रेम असते ?
  ketanv | 22-Dec-2016
  सर्व काही असतांना, चुकल्या सारखे वाटते. गाली हसू असतांना, मन रडू पाहते. कोणी आयुष्यात नसतांना, चाहूल आल्याच्या लागते. मन स्थिर असतांना, सैरभैर होऊ पाहते. डोळे उघडे असतांना स्वप्न दिसू लागते, खुळे मन त्या स्वप्नांना हाती धरू पाहते. एकदा फक्त सांग देवा, का हेच प्रेम असते ? - Ketan S Vadhavane 
  1 likes
  99 Views 0 Comments
 • वाटेतून चालतांना
  ketanv | 04-Jan-2017
  Poems
  » Long
  वाटेतून चालतांना चित्रविचित्र पात्र दिसतात, प्रत्येकाच्या डोळ्यात बरीच स्वप्न असतात. स्वप्न पूर्तीसाठी सगळे सैरभैर पळत असतात, नाती गोती मैत्री विसरून पायरी प्रमाणे एकमेकाला वापरतात. कोणी सरस्वतीला पाठीवर घेऊन आभाळ ठेंगणे करू पाहतो,  कोणी जीर्ण वस्त्रांनिशी यशाला मागणी घालू पाहतो, कोणी मर्दानी कडेवर लेकरू घेऊन भविष्याचा पाया रचत असते, कोणी बाप घरासाठी रक्ताच पाणी करत असतो, ह्या सगळ्या चढाओढीत कोणी देवाला लाच म्हणून नवसांचे डोंगर रचत असतो,  देव देखील अश्या वेळी ह्यांच्या लाचारीवर हसत असतो. चांगल्या वाईट काम साठी प्रत्येक जण विधात्या पुढे झुकतो,  कर्म करण्या आधीच साकडं घालून घालूनच तो पुरता थकतो. कोणी आपल्या श्रेष्ठत्वाने साऱ्या जगाला हिणवत असतो, परमात्म्याच्या सृष्टीला तो कवड्यांचे मोल लावत असतो. भौवतीक सुखाच्या अन स्वार्थाच्या या शर्यतीत प्रत्येकजण पळू पाहतो, निर्जीवतेच्या हव्यासा पोटी सारे आयुष्य उधळून टाकतो, मग आयुष्याच्या शेवटाला येऊन छोट्या छोट्या सुखांचा शोध घेतो, निसटलेल्या सजीव आनंदाचा हिशोब पाणावलेल्या डोळ्यांनिशी लावत राहतो. - Ketan S 
  2 likes
  92 Views 0 Comments
 • नोटांचे राजकारण
  ketanv | 04-Jan-2017
  काळ्या मनाला काळ्या धानाला आळा घालायला निघालो आम्ही, आमच्या या निर्णयाला डोळेझाकुन साथ देताल का तुम्ही. धाडसी निर्णयाने उतरवू विरोधकांची गुर्मी, त्यांच्या तोंडाला ताळ लावण्या करता सज्ज आमची डिजिटल आर्मी. पळवाटा शोधणाऱ्यां ना दया नाही कणभर, तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांना मात्र आश्वासने मनभर. निर्णय चुकीचा कि बरोबर या वादाला अंत नाही, digital transactions आणि cashless corrency चा  फरक पडेल का हो काही ?  - Ketan S Vadhavane   
  3 likes
  102 Views 0 Comments
 • Music of Life
  ketanv | 07-Jan-2017
  Poems
  » Long
  Life is playing music we all are dancing  we call that dance an experience enhancing.    All of us have to face a phase Where we desperately want to escape from a cage,  Where every one wants to write their own page,  For that, we are ready to put everything on gage. Throughout this phase aggression is there in our tone,  Unknowingly, life is pulling us out of  our comfort zone. Throughout this phase we have to play smart,  Whoever knows it all, For them Living is just an art   Life is playing music  we all are dancing  We call that dance an experience enhancing.   Each day is making us old  And day by day our moves are getting  Wise and bold that's why they say old is gold. With every situation we give ourselves a mould, In all circumstances our real self and emotions are getting sold, Whenever we feel like sold stay calm and put yourself on hold Don't think and plan anything Because,   Life is play
  2 likes
  90 Views 0 Comments
 • एक आठवण
  ketanv | 01-Feb-2017
  एक छोटीशी भेट ही खूप असते  एका आठवणी साठी  खूप बोललो जरी नाही तरी त्या क्षणातील शांतता ही खूप असते  एका आठवणी साठी  जरी माहित असले आपण नाही एक मेकां साठी  तरी कोना एकाला क्षणिक ऋणानुबंध ही खूप असतात  मनाच्या एका कोपऱ्यात दडलेल्या काळाच्या ओघात सूक्ष्म झालेल्या प्रीतीसाठी  काळ थांबत नाही आयुष्य थांबत नाही  पण निमिषार्धात संपणारा सहवास  आणि एक आठवण खूप असते  चालत राहण्याच्या प्रेरणे साठी. - Ketan S Vadhavane 
  3 likes
  117 Views 0 Comments
 • ketanv | 14-Feb-2017
  Poems
  » Long
  नभ दाटुनी येत दारा, आठवांचे थेंब बरसले  हे डोळे ओले झाले. ते दिस सोनेरी विसरू कसे, तुझे हसणे सखे मी विसरू कसे  तुझे ओठ जणू मधुशाला ती, ते ओठ गुलाबी विसरू कसे  हा श्वास जणू अडला आहे, तुझ वाचून आज उमगले  हे डोळे ओले झाले. तुझे नयन जणू तेजसस्वी खडे, त्या नयनांना मी विसरू कसे  तू झे केस जणू मऊ मखमल असे, त्या काळोखाला विसरू कसे  आयुष्य जणू रुसले आहे, तुझ वाचून आज उमगले  हे डोळे ओले झाले  तुझे नयनरम्य तारुण्य सखे, मज सांग आता मी विसरू कसे  मज साठी चे ते अश्रू तुझे, त्या मोत्यांना मी विसरू कसे  आयुष्य जणू अधुरे आहे, तुझ वाचून आज उमगळॆ  हे डोळे ओले झाले  हे डोळे ओले झाले. - Ketan S Vadhavane     
  1 likes
  106 Views 2 Comments
 • संधी
  ketanv | 15-Mar-2017
  Poems
  » Long
  संधी मिळत नसते ती निर्माण करायची असते. पण काही विषयात ती दिलीगेली पाहिजे. का संधी देणाऱ्याला आपल्या भावना कळू नये, कळत असूनही संधी मिळू नये,  ह्याला नशीब म्हणावे कि स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अपुरे पडणे म्हणावे, संधी साठी धडपडणाऱ्या जीवाला पडणारे प्रश्न म्हणजे, संधी देणाऱ्याच्या ठायी असेल कदाचित बाह्यत्वाचा प्रभाव किंवा आंतरिक सौंदर्य ओळखण्याचा आभाव. संधी साठी जिवाच्या आकांताने तडफडणाऱ्यांचे अनेक प्रकार, एखादा संधीच्छुक बनतो देवदासाचा दास, एखादा धरून बसतो मनात कायमची आस, एखादा शब्दांच्या सानिध्यात व्यक्त करतो आपला ध्यास, आणि एखादा कधीच सोडत नाही संधी ची वाट. संधी देणाऱ्याच्या मनाचा गोधळाही संधीच्छुक समजतो, सामाजिक अडचणी, मनाची दुविधा, भौतिकतेचा प्रभाव अनेक प्रश्न असतीलही कदाचित पण संधी देणाऱ्याने हा विचार केला पाहिजे कि संधीच्छुक हा संधी मागतोय  अंतिम निर्णय नाही,  संधी देणाऱ्याला संधीच्छुक ओळखता येऊ नये किंवा ओळखण्याचा प्रयत्न हि करू नये  ह्यामुळे आशावादावर खूप मोठा प्रश्न उभा राहणार. आणि आशावादी निराशेच्या वाटेवरून तडजोडीची पळवाट काढणार, आणि आशावादावरून
  1 likes
  119 Views 0 Comments
 • जेव्हा स्वप्न अश्रुंची जागा घेतात
  ketanv | 17-Mar-2017
  Poems
  » Long
    आयुष्याला विचारलं एकदा का इतका त्रास? सोडलेल्या रस्त्यांचा का पुन्हा पुन्हा आभास  का जवळ येतात क्षण आणि पुन्हा दूर जातात  का स्वप्न सगळे अश्रुंची जागा घेतात  आयुष्याला विचारलं एकदा  का हा एकटेपणा? सवय झालेल्या एक्कलकोंड्या प्रवासात मुद्दामच आयुष्य करवते सुखा चा भास हळुवार कुठे इच्छां ना पालवी फुटू लागते त्या आधीच आयुष्या तुझ्या क्रीडा त्यांना कोमेजून टाकतात  मग पुन्हा स्वप्न अश्रुंची जागा घेतात. आयुष्याला विचारलं एकदा  घेतोयसक का परीक्षा माझी? उत्तर आले हो, तुझीच नाही तर सर्वांचीच. अडथळे प्रत्येकाला वाट शोधण्याची संधी प्रत्येकाला  ज्याचा त्याचा दिवस ज्याने त्याने निवडावा.  मग एक दिवस आला, मला जाग आली  मी हि ठरवलं आता कळू नाही देणार तुला माझ्या भावना जे मनाच्या कोपऱ्यात दडलंय, नाही दाखवणार तुला लपून छापून का होईना, रास्ता माझा मी शोधेन. आणि मनात दडलेले सुदंर स्वप्न  आयुष्या, एकदा तरी मी जगेन. - Ketan S Vadhavane 
  0 likes
  101 Views 0 Comments
 • जिंदगी
  ketanv | 30-Apr-2017
  हमने तो पूछा जिंदगी से क्यू हमको सताती तू  भूलती जो रहे उन रहो को सामने क्यू लती तू  क्यू पास आती तू फिर दूर जाती तू  सपने दिखके क्यू हमको रुलाती तू  हमको न दर्द है न किसी मर्ज की जरुरत है  एह्सासोंको भुला अब चलना ही वक़्त की जरुरत है  पथरीली राहोसे अबतो गुजरना है बस अब इजाजत दे खुदसेही लड़ना है.
  1 likes
  112 Views 0 Comments
 • रास्ते
  ketanv | 26-Feb-2019
  नजाने ये रास्ते कहा लेजारहे है, सपनोंकी आस दिखाकर हर मोड़ से वही ले आ रहे है, सूरज भी रास्तोंके अँधेरे मिटा नहीं पा रहा, पथरीले रास्तों पर ठोकर हर कोई खा रहा, सबको अपने सपनोका हितो सहारा है, झूठी इस दुनिया में हर कोई तसल्ली पे जी रहा है, कोई अपने करोड़ पे तो कोई रोड पे, दुःख तो हर कोई सेह रहा है, फिर भी हर मोड़ पर दिलमे एक आस रहती है, खामोश राहोपर सासोंकी आवाज रहती है. - Ketan S Vadhavane     
  0 likes
  103 Views 0 Comments