×

वाटेतून चालतांना

By ketanv in Poems » Long
Updated 12:32 IST Jan 06, 2017

Views » 1651 | 2 min read

वाटेतून चालतांना चित्रविचित्र पात्र दिसतात,

प्रत्येकाच्या डोळ्यात बरीच स्वप्न असतात.

स्वप्न पूर्तीसाठी सगळे सैरभैर पळत असतात,

नाती गोती मैत्री विसरून पायरी प्रमाणे एकमेकाला वापरतात.

कोणी सरस्वतीला पाठीवर घेऊन आभाळ ठेंगणे करू पाहतो, 

कोणी जीर्ण वस्त्रांनिशी यशाला मागणी घालू पाहतो,

कोणी मर्दानी कडेवर लेकरू घेऊन भविष्याचा पाया रचत असते,

कोणी बाप घरासाठी रक्ताच पाणी करत असतो,

ह्या सगळ्या चढाओढीत कोणी देवाला लाच म्हणून नवसांचे डोंगर रचत असतो, 

देव देखील अश्या वेळी ह्यांच्या लाचारीवर हसत असतो.

चांगल्या वाईट काम साठी प्रत्येक जण विधात्या पुढे झुकतो, 

कर्म करण्या आधीच साकडं घालून घालूनच तो पुरता थकतो.

कोणी आपल्या श्रेष्ठत्वाने साऱ्या जगाला हिणवत असतो,

परमात्म्याच्या सृष्टीला तो कवड्यांचे मोल लावत असतो.

भौवतीक सुखाच्या अन स्वार्थाच्या या शर्यतीत प्रत्येकजण पळू पाहतो,

निर्जीवतेच्या हव्यासा पोटी सारे आयुष्य उधळून टाकतो,

मग आयुष्याच्या शेवटाला येऊन छोट्या छोट्या सुखांचा शोध घेतो,

निसटलेल्या सजीव आनंदाचा हिशोब पाणावलेल्या डोळ्यांनिशी लावत राहतो.

- Ketan S Vadhavane 

 

 

2 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.

Sign up for our Newsletter

Follow Us