तू दाखविलेल्या वाटेवर, अजूनही चालते मी
आपण गायलेली गाणी, अजूनही गुणगुणते मी!
तू मात्र तो रस्ता कधीच सोडलास,
आणि ते स्वरही केव्हाच विसरलास!
तरीही त्या आठवणी अजूनही जपल्यात मी,
आणि मनाच्या कोपऱ्यात त्यांना सजविल्या आहेत मी!
पण आठवणी तुझ्या,
आहेत फक्त कायमच्या माझ्या!
तुझा शब्द, तुझा स्पर्श
अजूनही देऊन जातो माला एक नवा हर्ष!
तू मात्र किती सहजपणे सगळेच विसरलास,
गेले ते दिस आणि सरले ते मास!