प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,
वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे,
वाटते स्वछंद व्हावे त्या खुळ्या पक्ष्यां परी,
वाटते कि स्थिर व्हावे उंच त्या वृक्षा परी,
पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,
प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,
वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे.
वाटते निश्चिन्त व्हावे सोडूनि चिंताच या,
वाटते आता जगावे माझ्याच साठी मी पुन्हा,
पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,
प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,
वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे.
या जीवाला व्यर्थ वाटे बांध नात्यांचे आता
वाटते कि मुक्त व्हावे तोडुनी बंधास या
पण मनाच्या या खुळाला वाट नाही सापडे,
प्रश्न उमगेना मला अर्थ शोधू मी कसे,
वाढले का हे दुरावे माझेच माझ्याशी असे.
(आयुष्याच्या प्रवासात)
पण उमगले सत्य मजला प्रश्न जीवन प्रेरणा,
प्रश्न म्हणजे घाव सारे, आयुष्य म्हणजे शिल्प हे,
घाव विना जे शिल्प घडते त्या शिल्प मी म्हणऊ कसे.
- Ketan S Vadhavane