पैसा, का रे तु असा ?
सर्वाना रडवितो ढसा-ढसा
तु मारतो श्रीमंतीचा ठसा
तूच करितो गरिबीचा हँसा
पैसा, असतानाही तु माझ्यापाठी
मला का वाटे? तु तिराकाठी
पोहत-पोहत आलो तुझ्यासाठी
तूच दाखवितो दरड़ाची काठी
पैसा, करु नकोस मला निर्लज्ज
आता तरी सांगून तक मज
तु नव्हतास, नाही, नसेल सज्ज
माझ्या दुखाचा करावयास पूज्य (श्यून्य )
--- शिप्रग्रज (राहुल एम. के.)