×

मी आहे तरी कौन?

By Deepak Bhansali in Poems » Short
Updated 13:04 IST Apr 20, 2020

Views » 1631 | 2 min read

मी आहे डोळ्यात साठून पडलेले अश्रू,
जे बाहेर निघण्याची वाट शोधू पाहत आहे,
पण मी रडणार तरी कुणासाठी,
आरश्या समोरच्या अनोळख्या व्यक्ती साठी?
कि नात्यांच्या नावावर होत असलेल्या भावनांच्या उप्श्योक्ती साठी?

मी स्वतः स्वताचा शत्रू बनलो, विश्वास टाकावा तरी कुणावर?
प्राण हि तेच घेतात, ज्यांच्यासाठी प्राण लावले पनावर..!!

मी आहे गवती चादरीवर पसरलेली ओस,
मी गवतावर जीव लावते, त्याला शोभा आणते, त्याचे एकटेपण दूर करते,
पण ते गवत देखील उन्हाच्या रोशानाईत मला विसरतो,
मला तो उन जिवंत जाळतो, तरी पुढच्या दिवशी पी पुन्हा येते,
मागच सर्व विसरून, एक नवीन आशा घेऊन, एक नव्या शुरुवाती साठी,
फक्त एक आस घेऊन, कि माझ्या भावना ह्या गवताला कधीतरी कळतील..!!

मी आहे भिंतीच्या छातडावर बसलेली घडी,
भिंतीचा रंग, सोबत राहणारे Calendar, समोरचे व्यक्ती, हृदयात थोच्लेले Cells
माझ्या अवती-भोवती सर्व काही बदलत राहत, मी मात्र ठाम उभी आहे,
वर्ष बदलतात, लोक बदलतात, लोकांच स्वभाव बदलतो,
माझी Tick-tick मात्र एकच चक्कर मारत आहे, फिरून परत त्याच ठिकाणी..!!

खोट आहे हे सर्व, नात्यांच्या गळफासात अडकून गेलेत सर्व,
स्वप्न पुरे करण्याच्या नादात फसून गेलेत सर्व,
पण वाळवंटात कितीही शोधा, कमळ काही सापडणार नाही,
आणि ह्यात, आपले स्वतःचेच अस्तित्व हरपून बसलेत सर्व..!!

 

Everything is a lie,

Everyone have been stucked in meaningless relations,

But one can never find a lotus in an endless desert,

And eventually,

all have been ended up losing their own identity!

 

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.

Sign up for our Newsletter

Follow Us