तुझे अस्तित्व प्रत्येक शब्दात भासवतोस तू,
प्रत्येक स्वरात माला ऐकू येतोस तू,
चहु दिशांनी माला व्यापले आहेस तू,
तुझ्या आठवणी ने रडू आले,
की हलक्या हाताने डोळे हि पुसतोस तू!
स्वप्नात येउन मला हसवतोस तू,
माझ्या जखमा भरायला लांबूनच फुंकर हि घालतोस तू!
मग अरे वेड्या हे हि दिवस आता लवकर साम्प्तीलच,
आपल्या जगात परत एकदा असू आपण दोघच!
ह्या आशे ची आहे माझ्या पाशी संजीविनी,
तुझीच वाट बघते आहे, तुझी मोहिनी!!