संधी मिळत नसते ती निर्माण करायची असते.
पण काही विषयात ती दिलीगेली पाहिजे.
का संधी देणाऱ्याला आपल्या भावना कळू नये,
कळत असूनही संधी मिळू नये,
ह्याला नशीब म्हणावे
कि स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अपुरे पडणे म्हणावे,
संधी साठी धडपडणाऱ्या जीवाला पडणारे प्रश्न म्हणजे,
संधी देणाऱ्याच्या ठायी असेल कदाचित
बाह्यत्वाचा प्रभाव किंवा आंतरिक सौंदर्य ओळखण्याचा आभाव.
संधी साठी जिवाच्या आकांताने तडफडणाऱ्यांचे अनेक प्रकार,
एखादा संधीच्छुक बनतो देवदासाचा दास,
एखादा धरून बसतो मनात कायमची आस,
एखादा शब्दांच्या सानिध्यात व्यक्त करतो आपला ध्यास,
आणि एखादा कधीच सोडत नाही संधी ची वाट.
संधी देणाऱ्याच्या मनाचा गोधळाही संधीच्छुक समजतो,
सामाजिक अडचणी, मनाची दुविधा, भौतिकतेचा प्रभाव अनेक प्रश्न असतीलही कदाचित
पण संधी देणाऱ्याने हा विचार केला पाहिजे कि संधीच्छुक हा संधी मागतोय
अंतिम निर्णय नाही,
संधी देणाऱ्याला संधीच्छुक ओळखता येऊ नये
किंवा ओळखण्याचा प्रयत्न हि करू नये
ह्यामुळे आशावादावर खूप मोठा प्रश्न उभा राहणार.
आणि आशावादी निराशेच्या वाटेवरून तडजोडीची पळवाट काढणार,
आणि आशावादावरून उडालेल्या विश्वास सोबत तो चालत राहणार.
- Ketan S Vadhavane