एक छोटीशी भेट ही खूप असते
एका आठवणी साठी
खूप बोललो जरी नाही तरी त्या क्षणातील शांतता ही खूप असते
एका आठवणी साठी
जरी माहित असले आपण नाही एक मेकां साठी
तरी कोना एकाला क्षणिक ऋणानुबंध ही खूप असतात
मनाच्या एका कोपऱ्यात दडलेल्या
काळाच्या ओघात सूक्ष्म झालेल्या प्रीतीसाठी
काळ थांबत नाही आयुष्य थांबत नाही
पण निमिषार्धात संपणारा सहवास
आणि एक आठवण खूप असते
चालत राहण्याच्या प्रेरणे साठी.
- Ketan S Vadhavane