Views » 790 | 1 min read
छंद माझा , छंद घे हा
घे भरारी नभी
तुंब आसवाने भरले
आसमान हे जरी
वात्सल्याचा स्पर्श मला
देईल का कोणीतरी
ज्ञान तृष्णा ही अधुरी
राहील का अंतरी
एक पाऊल मी टाकले
विश्वास कर मजवरी
चांदण्याची रोशनी ही
आणेल मी भूधरावरी
छंद माझा शिकण्याचा
घेईल भरारी नभी
Mukta Mulay 18-Sep-2017 21:17
sanchita 25-Sep-2017 14:47