आयुष्याला विचारलं एकदा
का इतका त्रास?
सोडलेल्या रस्त्यांचा का पुन्हा पुन्हा आभास
का जवळ येतात क्षण आणि पुन्हा दूर जातात
का स्वप्न सगळे अश्रुंची जागा घेतात
आयुष्याला विचारलं एकदा
का हा एकटेपणा?
सवय झालेल्या एक्कलकोंड्या प्रवासात
मुद्दामच आयुष्य करवते सुखा चा भास
हळुवार कुठे इच्छां ना पालवी फुटू लागते त्या आधीच
आयुष्या तुझ्या क्रीडा त्यांना कोमेजून टाकतात
मग पुन्हा स्वप्न अश्रुंची जागा घेतात.
आयुष्याला विचारलं एकदा
घेतोयसक का परीक्षा माझी?
उत्तर आले हो, तुझीच नाही तर सर्वांचीच.
अडथळे प्रत्येकाला वाट शोधण्याची संधी प्रत्येकाला
ज्याचा त्याचा दिवस ज्याने त्याने निवडावा.
मग एक दिवस आला, मला जाग आली
मी हि ठरवलं आता कळू नाही देणार तुला माझ्या भावना
जे मनाच्या कोपऱ्यात दडलंय,
नाही दाखवणार तुला
लपून छापून का होईना, रास्ता माझा मी शोधेन.
आणि मनात दडलेले सुदंर स्वप्न
आयुष्या, एकदा तरी मी जगेन.
- Ketan S Vadhavane