ज्याच्या मुखी नाही, प्रेमरूपी शब्द
तो साधु काय करि, भक्तास मुग्ध
सुड-राग-लोभ, बाळगुनिया अंगी
टाळ अन मृदुंग, वाजवी तिन्ही सांजी
जिव-प्राण ओतुनि, राहुल सांगतुया
भक्ति अशा भोंदूची, टाका आता मोडुनिया
जर करावयास भक्ति, करा प्रेमाची
दुबळ्या-पांगळ्यांची, भक्ति ती क्षमेची