शोधण्याचा प्रयत्न करतो
अस्तित्व माझे तारांगणात,
अंदाज लाऊ पाहतो सुखाचा मी एकांतात,
निर्विकार या डोळ्यातून शोधू पाहतो स्वप्नाची वाट,
कोणासठाऊक का
अपसुत येते निराशेची लाट,
तरी धीर देऊन सोडत नाही स्वतःचीच मी साथ,
आणि करू पाहतो त्या निराशेवरच मात,
खंत एकाच सलत राहते मनात,
करतांना निराशेवर मात नसते कोणाचीही साथ,
नंतर करतांना विचार मनात
वाटले देवाने
बांधली असेल आपलीही कोणाशी तरी गाठ.
बांधली असेल आपलीही कोणाशी तरी गाठ.
-ketan s. vadhavane