नभ दाटुनी येत दारा, आठवांचे थेंब बरसले
हे डोळे ओले झाले.
ते दिस सोनेरी विसरू कसे, तुझे हसणे सखे मी विसरू कसे
तुझे ओठ जणू मधुशाला ती, ते ओठ गुलाबी विसरू कसे
हा श्वास जणू अडला आहे, तुझ वाचून आज उमगले
हे डोळे ओले झाले.
तुझे नयन जणू तेजसस्वी खडे, त्या नयनांना मी विसरू कसे
तू झे केस जणू मऊ मखमल असे, त्या काळोखाला विसरू कसे
आयुष्य जणू रुसले आहे, तुझ वाचून आज उमगले
हे डोळे ओले झाले
तुझे नयनरम्य तारुण्य सखे, मज सांग आता मी विसरू कसे
मज साठी चे ते अश्रू तुझे, त्या मोत्यांना मी विसरू कसे
आयुष्य जणू अधुरे आहे, तुझ वाचून आज उमगळॆ
हे डोळे ओले झाले
हे डोळे ओले झाले.
- Ketan S Vadhavane