ती...

By Aditya in Experiences
Updated 19:14 IST Jul 10, 2018

आठवीत होतो मी. मामी कडे tuition ला जायचो. ती पण यायची तिथे... My first crush...
Like most teenagers मी कधी ते व्यक्त नाही केला...
नंतर म नऊवी मध्ये मोठा coaching class जॉईन केला आणि मामी कडे जाणं कमी झालं...

I think अकरावी मधली गोष्ट, एक दिवस अचानक मामा चा फोन आला, "Cinemaची extra तिकिटं आहेत, येतोस का?"
कुठला cinema ते आठवत नाही, महत्वाच पण नाही, कारण मी पोचलो निलायम थिएटरला, आणि पाहतो तर...., ती पण होती तिथे..!

Shit, दांडी गुल ना माझी, मामा चा इतका राग आला, चायला आधी सांगितलं असत तर बन-ठन के आलो असतो ना...
पण म्हणलं जाऊंदे, हा चान्स पण मामानीच निर्माण केला ना, म its ok...
Interval मध्ये मामा म्हणाला, "cold drink घेतोस का?" मी म्हणलं, "नको रे चहा घेऊ."
काय आहे माहित आहे का? की मोठी माणसं चहा घेतात, मी काय लहान होतो का तिच्या समोर cold drink प्यायला...
पण मामाला हे सगळं कुठे समजणार... म ती आणि बाकी लोक cold drink, सामोसा खात होते आणि मी style मधे चहा पीत होतो..
नजर चोरून बघत राहिलो तिच्याकडे, बस...

म मध्ये काही वर्ष अशीच गेली आणि एक दिवस अचानक बेहेरे कॉमर्स क्लासच्या समोर ती मला दिसली...
मी माझ्या मित्रांबरोबर होतो आणि तिने माझ्या कडे पहिला, नुसत पहिला नाही, ओळखलं सुद्धा...
तीहून पुढे आली आणि म्हणाली, "अरे किती दिवसांनी, कसा आहेस, काय करतोस?"
म मी पण जरा धिटाईने उत्तर दिले, "छान आहे, engineering करतोय वगरे..."
एक दोन क्षण बोललो आणि तिच्या मॆत्रिणीने हाक मारली तशी ती निघाली...
मी पण हाक मारली, ती मागे वळली, मी हात पुढे करत म्हणालो, "happy birthday".

मला आजही तिचे डोळे आठवतात, that astonishment... मला म्हणाली, "तुला कसं माहित?"
मी म्हणालो, "असंच..!"
ती हसली आणि मैत्रिणीसोबत निघून गेली...
पोरांनी खूप छळल मला, "कोण रे, कोण होती ती, भारी आहे, वगरे..."

त्या नंतर परत नाही दिसली, १६-१७ वर्ष झाली, पण मला आजही ते डोळे आठवतात...

कधी तरी आठवणीत रमणे काही वाईट नाही... हसू आलं, अंगावर शहारा आला, डोळ्यात किंचित पाणी आले तर येऊ दे की. काय हरकत आहे?
वस्तूस्थितीतल्या कोरडेपणा पेक्षा हे आठवणीतले ओले क्षण बरे नाहीत का..?

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.